HW News Marathi
देश / विदेश

चिन नागरीकावर हल्ला

बंगळूरू चीनच्या नागरीकावर पाच जणांनी हल्ला केला आहे . या हल्ल्यात चिनी नागरीक जखमी झाला आहे. याप्रकरणी बंगळूरू पोलिसांनी गुन्हा दाखल केली असून याप्रकरणी अधिक तपास करत आहे.

अधीक माहिती अशी की चीनमध्ये राहणारे यान यांचा व्यवसाय असून बंगळुरुत एका करारानिमित्ताने ते आले आहेत. शनिवारी त्यांची करारावर शिक्कामोर्तब करणारी एक बैठकही झाली. इंदिरानगर येथे टॅक्सीची वाट बघत असताना बाईकवरुन आलेल्या पाच जणांनी यान यांना मारणाह केली. त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न करताच हल्लेखोरांनी यान यांच्या चेहऱ्यावर चाकूने वार केले. हल्लेखोरांनी यान यांच्याकडील मौल्यवान वस्तू चोरण्याचा प्रयत्नही केला. मात्र यानच्या प्रतिकारामुळे हल्लेखोर पळून गेले. शेवटी यान यांनी मदत मागितली आणि थेट पोलीस ठाणे गाठले. यानला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे. यानच्या चेहऱ्यावर किरकोळ दुखापत झाली असून पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जम्मू विमानतळावर स्फोट, बॉम्बशोध पथक दाखल

News Desk

काँग्रेस पक्ष हा केवळ तुमच्या किंवा राहुलजींच्या हातात सुरक्षित आहे, राजीव सातव यांचे सोनिया गांधींना पत्र

News Desk

फडणवीसांचा दिल्लीत मेट्रोने प्रवास पण टीका मुंबईच्या मेट्रोवर

News Desk