HW News Marathi
देश / विदेश

दुचकीवरून आलेल्या दहशतवाद्यांनी केले गुजरातच्या बसवर हल्ला

वृत्तसंस्था ( जम्मू-काश्मीर)

अमरनाथ यात्रेकरूंवर भ्याड हल्ला करणारे दहशतवादी दुचाकीवरून आले होते. त्यांनी गुजरात पासिंग असलेल्या बसला जाणिवपूर्वक लक्ष्य केल्याचा निष्कर्ष तपास यंत्रणांनी काढला आहे.

दोन दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेकरुंच्या बसवर बेछुट हल्ला करून दहशतवाद्यांनी सहा जणांना ठार केले होते. हा हल्ला कसा झाला, कोणी केला, याचा पोलिस शोध घेत आहेत, परंतु दहशतवाद्यांचे लक्ष्य गुजरातची बस होती हे आता उघडकीस होत आहे. गुजरात पासिंगची बस महामार्गावरून गेल्याचे समजताच गुजरातविषय आकस असलेल्या दहशतवाद्यांनी दुचाकीवरून बसचा पाठलाग करून गोळीबार केला. यात सहा भाविक ठार झाले तर 13 जण जखमी झाले. बसचालकाने प्रसंगावधान दाखवल्याने इतर प्रवाशांचे प्राण वाचले. दरम्यान, हा हल्ला करण्यामागे दहशवाद्यांचा नेमका उद्देश तपास यंत्रणांनी शोधून काढल आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात येणार | परराष्ट्रमंत्री

News Desk

इमरान खान सरकारच्या नाकर्तेपणामुळे मुजफ्फराबाद वाचवणेही मुश्कील !

News Desk

सैन्यासाठीची मशीन गन खरेदी रद्द

News Desk