HW News Marathi
देश / विदेश

नितीशकुमार विश्वासघातकी-राहुल गांधी

नवी दिल्लीः भाजपच्या मदतीने बिहारमध्ये सत्ता स्थापन करणारे संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी जोरदार हल्ला चढविला आहे. नितीश कुमार विश्वासघातकी आहेत, अशा शब्दात राहुल यांनी नितीश यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला आहे.प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुल यांनी हा हल्ला केला. नितीश कुमार यांनी मोठा धोका दिला आहे. त्यांच्यासोबत भेट झाली होती. तेंव्हाच काही तरी गडबड होणार असल्याचा अंदाज आला होता, असं राहूल यांनी म्हटलं. कोणाच्या डोक्यात काय चालंल आहे, हे राजकारणात पटकन कळतं. अशा प्रकारचं प्लानिंग सुरू आहे, हे तीन-चार महिन्यापूर्वीच माझ्या लक्षात आलं होतं, असंही ते म्हणाले.

नितीश कुमार युपीए सोडून एनडीएमध्ये सामिल झाले, त्याबद्दल विचारले असता राहुल म्हणाले, भारताच्या राजकारणाची हीच शोकांतिका आहे. इथे स्वत:च्या व्यक्तिगत राजकीय स्वार्थासाठी लोक काहीही करू शकतात. काहीच नियम नाही. नैतिकता नाही, सत्तेसाठी कोणी काहीही करू शकतो

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशाचे गृहमंत्री कुठेच दिसत नाहीत, सामनातून टीका

News Desk

सुषमाजींच्या वचनबद्धतेची तुलना कशाशीही होऊ शकत नाही !

News Desk

ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांचे निधन

News Desk