HW News Marathi
देश / विदेश

पर्रिकर गोव्याचे नवे मुख्यमंत्री

गोव्याचे राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी काल मनोहर पर्रिकर यांची गोव्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर 15 दिवसांच्या आत बहुमत सिध्द करण्यास राज्यपालांनी सांगितलं. त्याआधी पर्रिकर यांनी राज्यपालांना भेटून सराकार स्थापनेसाठी बहुमत असल्याचा दावा केला होता. भाजपचे 12 आमदार, मगोपाचे 3 आमदार, गोवा फारवर्ड पार्टीचे 3 आणि अपक्ष आमदार 2 असं 21 जणांचे बहुमत असल्याचा दावा त्यांनी केला होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत 21 आमदारांना घेऊन पर्रिकरांनी काल राज्यपालांची भेट घेतली. पर्रिकर हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वी संरक्षण मंत्री पदाचा राजीनामा देतील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘आजीचा आणीबाणी लावण्याचा निर्णय चूक, पण…’

News Desk

काँग्रेसचा हात सपाची सायकल चालवू  शकणार नाही 

News Desk

आधार’ सर्वोच्च न्यायालयाकडून ‘निराधार’

News Desk