HW News Marathi
देश / विदेश

भाजपा पदाधिकाऱ्याच्या मुलाने केला तरुणीचा पाठलाग

हरयाणा – मद्यधुंद अवस्थेत एका तरुणीचा पाठलाग करणारा भाजपा पदाधिकाऱ्याचा मुलगा आणि त्याच्या मित्राच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. येथील भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांचा मुलगा विकास बराला (२३) आणि त्याचा मित्र आशिष कुमार (२२) या दोघांनी कारमधून तरुणीचा पाठलाग केला.

शुक्रवारी एक तरुणी रात्री साडेबाराच्या सुमारास तिच्या कारने सेक्टर ९ येथून पंचकुलाच्या दिशेने जाण्यासाठी निघाली. यादरम्यान बराला आणि कुमार या दोघांनी तिचा पाठलाग सुरू केला. शेवटी पीडित तरुणीने पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. पोलिसांनीही तातडीने या दोघांना अटक केली. अटकेनंतर पाठलाग करणारा तरुण हा भाजप प्रदेशाध्यक्षाचा मुलगा असल्याचेकळले. विकास ज्या कारमधून तरुणीचा पाठलाग करत होता ती कार बराला यांच्या नातेवाईकाची होती. पोलिसांनी कार ताब्यात घेतली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुस्पष्ट परराष्ट्र धोरणामुळे भारताची खंबीरता जगात पोहोचली! – उपमुख्यमंत्री

Aprna

नवाज शरीफ आणि मुलगी मरियमला विमानतळावर अटक

News Desk

मराठा आरक्षणावरील आजची सुनावणी पुढे ढकलली, पुढील सुनावणी ५ फेब्रुवारीला होणार!

News Desk