अहमदाबाद – काँग्रेसमुक्त भारतचा नारा देणाऱ्या भाजपला त्यांच्या बालेकिल्ल्यातच मोठं आव्हान मिळाले आहे. पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलने गुजरातमधून भाजपला संपवण्याची गर्जना केली आहे. २०१७ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपला संपवणार असल्याचे त्याने ‘अहमदाबाद मिरर’ या वृत्तपत्राला सांगितले.
भाजपला गुजरातमधून संपवणार ही गोष्टी स्पष्ट आहे. आमच्या समाजातल पटेलांनीच भाजपला सत्तेवर आणले होते. आता तेच त्यांना धूळ चारतील. शेतकऱ्याचा मुलगा या नात्याने मी गुजरातला हे वचन दिले आहे, असे हार्दिकने म्हटले आहे. या वेळी त्याने आप आणि काँग्रेसबरोबर जाण्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्न टाळण्याचा प्रयत्न केला.
काही दिवसांपूर्वी आरक्षणासाठी हार्दिकने गुजरातमध्ये मोठे आंदोलन केले होते. माझ्या आंदोलनाला मोदी सरकार घाबरले आहे. परंतु मोदी आणि अमित शहा यांच्याप्रमाणे मला काही लपवण्याची व कोणाला घाबरण्याची गरज नाही, असे तो म्हणाला.
तुम्ही एखाद्यावर राजद्रोहाचा आरोप लावण्यासारखे दुसरे वाईट कार्य करू शकत नाही. सरकारने माझ्यावर राजद्रोहाचा आरोप लावला. त्यानंतर ९ महिने मला तुरूंगात ठेवले. परंतु यामुळे खचलो नाही तर आणखी मजबूत झालो आहे. मला देशातील लोकांचा पाठिंबा मिळत आहे. माझ्या वयाचे युवक माझ्याबरोबर आहेत. यापेक्षा सरकार माझ्याबरोबर आणखी वेगळे काय करू शकते, असा सवाल केला.
भाजपवर निशाणा साधताना तो म्हणाला, भाजप जनतेचे प्रतिनिधीत्व करत असल्याचा कितीही दावा करत असले तरी यात काहीच तथ्य नाही. माझ्या कुटुंबीयाने भाजपच्या विजयासाठी मोठी मेहनत घेतली होती. परंतु भाजप त्या लोकांना विसरली आहे. भाजप आता त्यांचे प्रतिनिधीत्व करत नाही. मी आरक्षण मागत आहे, भीक मागत नाही. मी फक्त सरकारी नोकरी आणि दाखल्यांवर पाटीदार समाजाला समान संधी मिळण्याची मागणी करत आहे. मी एससी, एसटी आणि ओबीसीच्या आरक्षणाविरोधात नाही. मला देशाच्या विकासासाठी आरक्षणाची आवश्यकता वाटते, असे तो म्हणाला.
हार्दिक पटेलने सरकारी धोरणांचाही विरोध करत अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यावर निशाणा साधला. भाजपकडून एकीकडे सांगण्यात येते की, हा अर्थसंकल्प हा देशातील जनतेसाठी आहे. पण देशातील ९७ टक्के जनतेला हे समजलेलच नाही. देशातील शैक्षणिक गुणवत्तेवर खंत व्यक्त केली. सरकार या दिशेने काहीच काम करत नसल्याचा आरोप त्याने केला. भाजप हा पक्ष महिला विरोध पक्ष असल्याचीही टीका त्याने केली. निर्भया कांडवर सर्वाधिक गोंधळ भाजपने केला. परंतु, महिलांसाठी भाजपने काय काम केले, हे भाजपच्या नेत्यांनी सांगावे, असे आवाहन केले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.