HW News Marathi
देश / विदेश

भारत-चीन युद्ध पेटविण्याचा अमेरिकेचा प्रयत्न-चीन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डोकलाममधील वादाच्या पार्श्वभूमीवर “वॉशिंग्टन एक्झामिनर’ या प्रसिद्ध प्रकाशनामध्ये भारतास पाठिंबा व्यक्त करणारा लेख प्रसिद्ध झाल्यामुळे चीनकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. भारत व चीनमध्ये संघर्ष व्हावा, यासाठी अमेरिका प्रयत्न करत असल्याची टीका “ग्लोबल टाईम्स’ या चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या ग्लोबल टाइम्स या वृत्तपत्रामधून करण्यात आली आहे.

‘ट्रम्प मस्ट सपोर्ट इंडिया अगेन्स्ट चायना’ या शीर्षकाचा लेख दोन दिवसांपूर्वी वॉशिंग्टन एक्झामिनरमध्ये प्रसिद्ध झाला होता. या लेखामध्ये चीनच्या वाढत्या आक्रमकतेच्या पार्श्वभूमीवर भारतास अमेरिकेकडून पाठिंबा देण्यात यावा, अशा आशयाचे स्पष्ट आवाहन ट्रम्प प्रशासनास करण्यात आले होते. यामुळे ग्लोबल टाईम्समधून या लेखावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे.

“जगात जेथे संघर्ष उद्भवतो तेथे अमेरिका दिसून येतेच. अमेरिकेकडून समस्या सोडविण्यासंदर्भात नि:पक्षपाती भूमिका क्वचितच घेण्यात येते. एक्झामिनरमधील या लेखामध्ये चीनकडून असलेला धोका अधिक फुगवून सांगण्यात आला आहे. यामध्ये आश्चर्य काहीच नाही. याशिवाय, भारत-अमेरिकेमधील संबंधांचेही चित्र अधिक भडकपणे रंगविण्यात आले आहे. अमेरिकेकडून दक्षिण चिनी समुद्रामध्ये राबविण्यात येत असलेल्या धोरणाचेच प्रतिबिंब भारतास व्यक्त करण्यात येत असलेल्या या पाठिंब्यामध्ये दिसून येत आहे. स्वत:च्या व्यूहात्मक फायद्यासाठी काही पाश्चिमात्य घटक भारत व चीनमध्ये युद्ध घडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यामुळे त्यांचे काहीच नुकसान न होता उलटपक्षी फायदाच होणार आहे. दक्षिण चिनी समुद्राबाबतही अमेरिकेकडून हेच धोरण राबविण्यात येत आहे,” अशा आशयाची भूमिका ग्लोबल टाईम्समधील या लेखामधून व्यक्त करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या दरवाढीला ब्रेक; देशात मात्र…

News Desk

शहरात नेमके किती खड्डे | सर्वोच्च न्यायालय

News Desk

कर्नाटकात इमारत कोसळली, एकाचा मृत्यू

News Desk