HW News Marathi
देश / विदेश

मोदी, शहा नथुरामचे वारसरदार

पाटणा( वृत्तसंस्था)-बिहारमधील सध्याच्या राजकीय भूकंपाचे सर्व खापर नितीकुमार यांच्यावर फोडत राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी मोदी व शहा यांनाही लक्ष्य केले आहे. ‘देशाला एकत्र आणण्यासाठी आज आपल्यात गांधीजी नाहीत, हे दुर्दैव आहे. मोदी आणि शहा नथुराम गोडसेच्या वारसदार असल्याचे लालू यांनी म्हटले आहे. बिहारमध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडीनंतर लालू यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी, शहा यांच्यासह नितीशकुमार यांच्यावर टिकास्र सोडले. नितीशकुमार यांचाउल्लेख ‘भस्मासूर’ असा करत, ही मॅच फिक्स होती, आमचं काहीच चुकलेलं नाही, असा पवित्रा लालूंनी घेतला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पद्मनाभस्वामी मंदिराचं व्यवस्थापन आता राजघराण्याकडे

News Desk

तालीबानी थेट गोळ्या घालतील ,आई-वडिलांना भारतात आणण्यासाठी मोहम्मदची सरकारकडे याचना !

Jui Jadhav

अरुण जेटली यांची प्रकृती चिंताजनक

News Desk
देश / विदेश

बिहारमध्ये राजकीय भूकंप

News Desk

नवी दिल्ली: बिहारमध्ये राजकीय भूकंप झाला आहे. राज्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. जेडीयूच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राजीनामा दिला आहे. राज्यपाल के. एन. त्रिपाठी यांची भेट घेऊन त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. नितीश यांच्या राजीनाम्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. इतकेच नाही तर मोदींनी त्यांना भाजपमध्ये येण्याची आॅफरही दिली आहे. भ्रष्टाचाराशी आपण एकत्र लढू असेही मोदींनी म्हटले आहे.

तेजस्वी यादव उपमुख्यमंत्रीपद न सोडण्यावर ठाम आहेत. आरोप असलेल्या मंत्र्यांसोबत काम करणे अशक्य असल्याचे नितिशकुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर सांगितले आहे. बिहारच्या हितासाठी आपण काहीही करायला तयार आहे.

बिहारमधील जेडीयू-आरजेडी-काँग्रेस महायुती अवघ्या २० महिन्यांत तुटली आहे. लालू प्रसाद यादव यांनी ही चर्चा वायफळ असल्याचे म्हटले होते. महाआघाडी तुटण्याचा प्रश्नच नसल्याचे ते म्हणाले होते.

‘नितीशकुमारांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर तेजस्वी यादव यांचा राजीनामा मागितलेला नाही. या प्रकरणात मीडियालाच अधिक स्वारस्य आहे. नितीशकुमार आमचे नेते आहेत. ‘महाआघाडीत फूट’ या मीडियातून पसरवल्या जाणाºया अफवा आहेत.’, असे लालूंनी काही वेळेपूर्वी म्हटले होते.

राष्ट्रीय जनता दलाच्या आमदारांची बुधवारी बैठक झाली. त्यानंतर लालू यादव म्हणाले, ‘बिहार सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे. महाआघाडीत काहीही चलबिचल नाही. सगळ्या मीडियाच्या अफवा आहेत. नितीशकुमारांनी तेजस्वींचा राजीनामा मागितलेला नाही.’ तेजस्वी यादवही म्हणाले की मला कधीही राजीनामा मागितला गेला नाही. नितीशकुमारांनीही आज आमदारांची बैठक बोलावली आहे. लालू यादव व त्यांच्या कुटुंबावर रेल्वे निविदा घोटाळा आणि बेहिशेबी मालमत्ते प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तेजस्वी यादवांच्या राजीनाम्याची भाजपने मागणी केली होती. जेडीयूचे म्हणणे होते की तेजस्वी यांनी जनतेसमोर स्पष्टीकरण द्यावे.

Related posts

जेट एअरवेजच्या विमानाची पुन्हा एकदा इमर्जन्सी लँडींग

swarit

भंगारात सापडलेल्या नाण्याची किंमत दीड कोटी

News Desk

देशाच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक तसेच राजकीय विकासामध्ये महाराष्ट्र आणि पुण्याचे महत्त्वाचे योगदान! – राष्ट्रपती

Aprna