HW News Marathi
देश / विदेश

मराठा मोर्चाला पाकिस्तानातूनही पाठिंबा

मुंबई : विविध मागण्यांसाठी राज्यभरात काढण्यात आलेल्या मराठा मोर्चांनंतर आता ऑगस्ट क्रांती दिनी अर्थात गुरुवार ९ ऑगस्ट रोजी मराठा समाजाचा भव्य मोर्चा मुंबईत धडकणार आहे. या मोर्चाला देशभरातील विविध संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहेच, पण त्याबरोबरच चक्क पाकिस्तानातील मराठा समाजानेही पूर्ण पाठिंबा दिला आहे.

बलुचिस्तानातील मराठा समाजाच्या मराठा कौमी इतेहादया संघटनेने राज्यातील मराठा क्रांती मोर्चाला पूर्ण पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. संघटनेच्या ‘मराठा ट्राइब’ या फेसबुक पेजवर पाठिंब्याचीपोस्ट टाकण्यात आली आहे. भारतातील मराठा समाजाला नोकरी,शिक्षणात आरक्षण मिळावे, अशी मागणी संघटनेने केली आहे.

मराठा कौमी इतेहाद’ संघटना भारतातील मराठा मोर्चाला पूर्ण पाठिंबा देत आहे. मराठा समाजावर अन्याय होत आहे, त्याचा मी निषेध करतो. मराठा समाजाला सरकारी नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मिळायलाच हवे. तो त्यांचा राष्ट्रीय हक्क आहे. त्यांच्या प्रत्येक लढ्यात आम्ही सहभागी आहोत. पाकिस्तानातील मराठ्यांना न्याय मिळतो, मग भारतातील मराठ्यांना का नाही? पाकिस्तानातील मराठा समाज याचा तीव्र निषेध करतो”, असेमराठा कौमी इतेहाद’ (पाकिस्तान)चे प्रमुख वदेरा दिन मोहम्मद मराठा बुगटी यांनी म्हटले आहे.

पानिपतचे युद्ध कैदी

१७६१ साली झालेल्या पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांचा दारूण पराभव झाला होता. त्यानंतर विजेत्या अब्दालीने मराठा युद्धकैद्यांना बंदी बनवून अफगाणिस्तानमध्ये नेण्याचा प्रयत्न केला. पण अंतर जास्त असल्याने ते शक्य झाले नाही. त्यामुळे त्याने बलुचिस्तानात येथे या मराठा सैनिकांची विक्री केली. तिथे ते गुलाम म्हणून राहिले, त्यांचेधर्मांतर झाले. पण त्यांची मराठा आडनावे अजूनही कायम आहेत आणि त्यांना मराठा असण्याचा अभिमानही आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जैश-ए-मोहम्मद कडून स्टील बुलेटचा वापर

News Desk

मनमोहन सिंग यांच्या बंधूचा काँग्रेसला रामराम, ‘आप’मध्ये प्रवेश

News Desk

औरंगाबाद विमानतळाचे नाव ‘छत्रपती संभाजी महाराज’विमानतळ करण्यास मान्यता !

Arati More