HW News Marathi
देश / विदेश

लवकरच रामदेवबाबांची जिन्सही बाजारात!

नवी दिल्ली – योग विद्या शिकवता शिकवता, सर्व गृहउपयोगी पदार्थ आणि पाकिटबंद खाद्यपदार्थ बाजारात आणणाऱ्या योगगुरू रामदेवबाबा यांच्या ‘पतंजली’कडून आता चक्क जिन्स पॅण्टही विकण्यात येणार आहेत. रामदेवबाबा लवकरच वस्त्रोद्योग क्षेत्रात उतरणार असून देशभरात कपड्यांची दुकाने सुरू करणार आहेत. लाईव्ह मिंट’च्या वृत्तानुसार येत्या एप्रिल महिन्यापासून पतंजलीकडून कपड्यांची विक्री केली जाणार आहे.

लवकरच पतंजली समूहाकडून स्वदेशी कपड्यांची दुकाने सुरू करण्यात येणार असल्याची माहिती रामदेव बाबा यांचे प्रवक्ते एस. के. तिजारावाला यांनी दिली. पतंजली समूहाकडून सुरु करण्यात आलेल्या दुकानांमध्ये महिला, पुरुष आणि लहान मुलांचे कपडे विक्रीस उपलब्ध असणार आहेत. कपड्यांच्या व्यवसायातून पहिल्या आर्थिक वर्षात ५ हजार कोटी रुपयांच्या विक्रीचे लक्ष्य पतंजलीकडून निश्चित करण्यात आले आहे. पतंजलीच्या दुकानांमध्ये हातमागाचे, मशीनवर तयार करण्यात आलेले कपडे विक्रीला ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये डेनिमपासून तयार करण्यात आलेल्या कपड्यांचादेखील समावेश असेल.

पतंजली समूहाकडून देशभरात सुरु करण्यात येणाऱ्या कपड्यांच्या दुकानाचे नाव परिधानअसेल,अशी माहिती एस. के. तिजारावाला यांनी दिली. परिधानया नावाने देशभरात पहिल्या टप्प्यात २५० दुकाने सुरू करण्यात येणार आहेत. पतंजलीचे कपडे बिग बाजारसह देशाच्या अन्य रिटेल आऊटलेट्सवर उपलब्ध असणार आहेत. याशिवाय खादी भवनमध्येदेखील हे कपडे विक्रीस ठेवले जातील. तसेच त्यांची ऑनलाइन खरेदीही करता येईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्राने जाहीर केलेल्या पॅकेजप्रमाणे राज्यातील सर्व लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी यंत्रणेला सूचना

swarit

“ते आमच्यावर बॉम्ब टाकणार होते, पण तो त्यांच्याच हातात फुटला”, संजय राऊतांचा निशाणा

News Desk

फडणवीसांनी महाविकासआघाडीला दिले १०० पैकी १५ गुण !मुख्यमंत्र्यांनी उडवली खिल्ली ..

Arati More