HW News Marathi
देश / विदेश

शशिकला यांच्याविरोधात माझ्याकडे सबळ पुरावे- डी. रुपा

बेंगरूळ (वृत्तसंस्था) एएमआयडीकेच्या नेत्या शशिकला यांना कारागृहात व्हिआपी वागणूक मिळत आहे, याबाबत खुलासा करणाऱ्या करणाऱ्या कारागृह अधिकारी डी. रुपा यांनी आणखी एक खळबळजनक दावा केला असून जेलमधील सर्व घडामोंडीबाबते पुरावे आपल्याकडे उपलब्ध असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यामुळे सत्ताधारी संकटात येण्याची शक्यता आहे, तसेच प्रशासनाची अडचण वाढणार आहे.

गैरव्यवहार प्रकरणात शशिकला यांना अटक झाली असून त्या सध्या बेंगळूरू येथील कारागृहात शिक्षा भोगत आहेत. परंतु कारागृहात त्यांना स्पेशल वागणूक दिली जात आहे. त्यांच्यासाठी पाच खोल्या रिकाम्या ठेवण्यात आल्या आहे. खास स्वयंपाकगृह, झोपण्यासाठी अलिशान शयनगृह, टीव्ही संच आदी सुविधा पुरवल्या जात असून त्या जेल कायद्याच्या भंग करणाऱ्या आहेत, असे यापूर्वीच त्यांनी स्पष्ट केले आहे. परंतु हे प्रकरण उजेडात आल्यानंत डी. रुपा यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. यानंतर रुपा यांनी या सर्व आरोपांचे आपल्याकडे पुरावे असल्याचा दावा केला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काश्मीर हा द्विपक्षीय मुद्दा, एस. जयशंकर यांचे संसदेत स्पष्टीकरण

News Desk

अदानी कंपनीचे मुख्यालय मुंबईतून गुजरातला हलवले

News Desk

विमानात अडकले २३४ प्रवासी

News Desk