HW News Marathi
देश / विदेश

शाहिद अब्बासी पाकचे नवे पंतप्रधान

इस्लामाबाद – शाहिद खाकन अब्बासी यांची मंगळवारी पाकिस्तानचे हंगामी पंतप्रधान म्हणून निवड झाली. अब्बासी हे पुढील ४५ दिवसांसाठी पंतप्रधानपदावर राहणार आहेत. पिपल्स पार्टीच्या नवीद कमर यांचा त्यांनी पराभव केला.

संसदेच्या नव्या नेत्याची निवड करण्यासाठी पाकिस्तानचे राष्ट्रपती ममनून हुसैन यांनी मंगळवारी कनिष्ठ सभागृह नॅशनल असेंब्लीची बैठक बोलावली होती. या वेळी पाकिस्तानी खासदारांनी माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या जागेवर नव्या पंतप्रधानांना निवडून दिले. सत्ताधारी पक्षाचे दिग्गज नेते शाहिद खाकान अब्बासी हेच हंगामी नेते असतील, असे यापूर्वीच मानण्यात येत होते.

नवाज शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) या पक्षाने शरीफ यांचे भाऊ शहबाज या पदावर बसण्यायोग्य होईपर्यंत अब्बासी यांना हंगामी पंतप्रधान म्हणून मान्यता दिली. पाकिस्तानात अशा प्रकारे निवडीच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. पूर्वीचे लष्करशहा जनरल परवेझ मुशर्रफ यांच्या कार्यकाळात सत्ताधारी पक्ष मुस्लिम लीग कयाद-ए-आजम कडून शौकत अजीज यांची निवड होईपर्यंत राजकीय नेते चौधरी शुजात हुसैन यांना हंगामी पंतप्रधान बनवले होते.

पंतप्रधानपदासाठी विरोधीपक्षाकडून एक उमेदवार निश्चित होत नसल्याने त्याच्याकडून पाच उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात होते. पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (पीटीआई)ने आवामी मुस्लिम लीगचे (एएमएल) नेते शेख रशिद यांचे नाव पंतप्रधानपदासाठी पुढे केले होते. पाकिस्तानच्या ३४२ सदस्य संख्या असलेल्या संसदेत पीएमएल-एन या पक्षाच्या १८८ जागा आहेत.

पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी ६७ वर्षीय पंतप्रधान नवाज शरीफ यांना पनामा पेपर घोटाळ्याप्रकरणी दोषी ठरवले होते. त्यानंतर शरीफ आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे निर्देशही दिले. त्यामुळे शरीफ यांना पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावे लागले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दक्षिण कोरियाकडून ‘सेऊल शांतता पुरस्कार’ प्रदान

News Desk

भारतीय संविधान जगासाठी आदर्श!; मंत्री धनंजय मुंडेंनी दिल्या संविधान दिनाच्या शुभेच्छा

News Desk

#IndependenceDay : सरकारचा दबावही नसावा अन् अभावही नसावा !

News Desk