HW News Marathi
नवरात्रोत्सव २०१८

पद्मश्री पी.व्ही. सिंधूचा रोमांचक प्रवास

पी.व्ही. सिंधू यांचे पूर्ण नाव पुसारला वेंकटा सिंधू आहे. पुसारला वेंकटा सिंधू हि भारतीय बॅटमिंटनपटू आहे. सिंधू ही.पी.व्ही.रामण्णा आणि पी.विजया या राष्ट्रीय व्हॉलीबॉलपटूंची कन्या आहे. रामण्णा यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सिंधूचा जन्म ५ जुलै १९९५ मध्ये हैद्राबाद येथे झाला होता. अवघ्या २१ व्या वर्षी सिंधूने बॅटमिंटन खेळात मोठे नाव कमावले आहे. लहान वयात ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक पटकावणारी सिंधू ही पहिली भारतीय महिला क्रीडापटू आहे. सिंधू १७ वर्षांची असताना आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त केली आहे. सायना नेहवालनंतर ऑलिम्पिक पदक पटकावणारी सिंधू ही दुसरी भारतीय बॅडमिंटनपटू आहे. पुर्सला वेंकटा सिंधू यांनी २०१६ मध्ये ऑलिम्पिक खेळात बॅडमिंटन मध्ये तीने रौप्य पदके जिंकून देशाचा मान वाढविला आहे.

कोरिया सुपर सीरिज स्पर्धेचे जेतेपद पटकावणारी सिंधू ही पहिली भारतीय बॅडमिंटनपटू आहे. सिंधूने २०१३, २०१४ आणि २०१५ मध्ये या स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले आहे.

२०१३ मध्ये अर्जुन पुरस्काराने तर २०१५ मध्ये सिंधूला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.२०१६ मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी सिंधूची निवड झाली होती. रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक पटकावणाऱ्या सिंधूला तेलंगणा सरकारने हैदराबादमधील १,००० चौरस जमीन बक्षीस म्हणून दिली आहे. २०१७ मध्ये आतापर्यंत सिंधू एकूण ३३ सामने खेळली आहे. त्यात २२ सामन्यांमध्ये तिला जेतेपद मिळालं आहे, तर ७ सामन्यांमध्ये तिला हार पत्करावी लागली आहे.

पी. व्ही. सिंधूला मिळालेले पुरस्कार

पद्मश्री – भारताचा चौथा सर्वश्रेष्ठ सन्मान ( २०१५ )

अर्जुन अवाॅर्ड ( २०१३ )

२०१४ चा स्पोर्ट पर्सन आॅफ द इयर चा सन्मान.

२०१४ मध्ये इंडियन आॅफ दी इयर सन्मान.

२०१५ मध्ये मकाउ ओपन बॅडमिंटन चॅंपियनशिप जिंकल्याबद्दल भारतिय बॅडमिंटन असोसिएशन आॅफ इंडिया तर्फे १० लाख रोख व प्रशस्ती पत्रक.

२०१६ मध्ये मलेशिया मास्टर्स जिंकून परत बॅडमिंटन असोसिएशन आॅफ इंडियाने ५ लाख रोख व प्रशस्ती पत्रक

२०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये शानदार कामगिरीबद्दल तेलंगाणा सरकारने ५ करोड चे रोख बक्षिस आणि

दिल्ली सरकार तर्फे २ करोडचे रोख बक्षीस

हरियाणा सरकार तर्फे ५० लाख रोख बक्षिस.

मध्यप्रदेश सरकार तर्फे ५० लाख रोख बक्षिस.

मिनिस्ट्रिी आॅफ युथ अफेअर्स अॅण्ड स्पोर्ट कडून ५० लाख रोख पुरस्कार.

बॅडमिंटन असोसिएशन आॅफ इंडिया व्दारा ५० लाख रोख बक्षिस.

इंडियन आॅलम्पीक असोसिएशन व्दारा ३० लाख रोख बक्षिस.

आॅल इंडिया फुटबाॅल फेडरेशन व्दारा ५ लाख रोख बक्षिस.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आजचा रंग गुलाबी, ‘सिद्धीदात्री’ रूपात घ्या देवीचे दर्शन

News Desk

भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी

News Desk

‘विक्रोळीच्या आई शिवाई’चे हे देखणे रूप

swarit