HW News Marathi
नवरात्रोत्सव २०१८

महिला उद्योजिका मीनल मोहाडीकर

महाराष्ट्रात हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच महिला व्यावसायिक आणि उद्योजक आहेत. अशा मोजक्या पर्यंत कमी वेळात यशाचे शिखर गाठलेल्या उद्योजिका मीनल मोहाडीकर महाराष्ट्रासह ज्या ज्या ठिकाणी मराठी महिला उद्योजिका आहे त्या त्या प्रत्येक महिलेसाठी प्रेरणास्थान आहेत. कुठल्याही डेरेदार वृक्षाचे मूळ हे एका छोटय़ा बीजामध्ये असते. तसेच मीनल मोहाडीकर यांच्या व्यवसायाची सुरुवातही अशीच अगदी लहान गोष्टीतून झाली. मीनल या आम्ही उद्योगिनीच्या संस्थापक अध्यक्ष आहेत. सर्वसामान्य उद्योगिनींसाठी एक व्यासपीठ निर्माण व्हावे म्हणून ८ मार्च १९९७ मध्ये आम्ही उद्योगिनी या संस्थेची स्थापना करण्यात आली. आ

आजपर्यंतच्या इतिहासात महाराष्ट्र चेम्बर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चरची पहिली महिला अध्यक्ष जर कुणी असेल तर मीनलताईंचे नाव सन्मानपुर्वक घेतले जाते. त्यांनी संपुर्ण महाराष्ट्र पिंजून काढल्यानंतर त्यांच्या लक्षात आले कि महिला उद्योजिकांसाठी वेगळे व्यासपीठ स्थापन झाले पाहिजे. त्यातून या संस्थेची निर्मिती झाली. या संस्थेला २१ वर्ष पूर्ण झाली असून आम्ही उद्योगिनीच्या एकूण अठरा शाखा आहेत. महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये हि संस्था आहेच पण आता बंगलोर आणि दुबईला देखील या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे . मीनलताईंची आई घरबसल्या उद्योग म्हणून ‘देसाई बंधू आंबेवाले’ यांच्या उत्पादनांची विक्री करत असे.

मीनल यांनी कधीही मार्केटिंगचे वेगळे शिक्षण घेतले नव्हते. परंतु अनुभवाने त्यांनी मार्केटिंगच्या क्षेत्रात उत्तुंग भरारी मारली ती सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. मुंबई येथील सावरकर स्मारक मध्ये आपणा बाजार आणि लोकप्रभा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात आम्ही उधोगिनीने छोट्या महिला उद्योगिनींना कमी पैशात स्टॉल्स उपलब्ध करुन दिले. तेव्हा आम्ही उद्योगिनीचे पहिले प्रदर्शन पार पडले. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, रत्नागिरी तसेच दुबई येथे अनेक प्रदर्शने झाली. प्रदर्शन करत असताना त्यांनी अनेक माणसे जोडली.

मला कोणी तरी मदतीचा हात दिला होता म्हणून महिलांना मदत करावी म्हणून आम्ही उधोगिनीची संस्था स्थापन केली असे मीनल मोहाडिकर सांगतात. या महिला उद्योगिनी नवीन नवीन कल्पना मांडत आहेत. त्या मुले नवीन प्रॉडक्ट तयार होण्यास मदत होत आहे. एक महिला उभी राहिली कि अनेक महिला उभ्या राहतात, मार्केटिंग म्हणजे तुम्ही जेवढे बोलालं तेवढे तुम्ही विकू शकाल , फक्त प्रॉडक्ट चांगले असणे गरजेच नसून विकणारीचे बोल पण गोडं असायला हवं” असेही त्या म्हणतात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हा तर समस्त महिलावर्गाचा अपमान !

News Desk

आदिशक्तीच्या आभूषणांना हिऱ्यांची सजावट

Gauri Tilekar

भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी

News Desk