HW News Marathi
व्हिडीओ

Jalgaon Flood बोरी नदीच्या पुरामुळे 13 वर्षीय आदिवासी बालिकेचा मृत्यू!

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील सात्री गावात मंगळवारी सकाळी एक दुर्दैवी घटना घडली असून शासकीय यंत्रणेची उदासीनता व अकार्यक्षम प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली आहे. बोरी नदीला आलेल्या पुरामुळे सात्री गावातील आरुषी सुरेश भिल या १३ वर्षीय बालिकेचा उपचाराअभावी मृत्यू झाला. गेल्या २३ वर्षांपासून या गावाचा पुनर्वसनासाठी लढा सुरु आहे. मात्र शासन व प्रशासनाच्या कासवगतीमुळे पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही . त्याचा फटका निष्पाप आरुषीला बसला. मुसळधार पावसामुळे बोरी नदीला अनेक दिवसानंतर पूर आला आणि सात्री गावाचा गेल्या चार दिवसांपासून तालुक्याशी असलेला संपर्क तुटला होता. गावातून बाहेर पडण्यासाठी दुसरा मार्ग नसल्याने तापाने फणफणत असलेल्या आरुषीला प्रयत्न करूनही गावकऱ्यांना वाचवण्यात यश आल नाही.

#JalgaonFlood #Amalner #Satri #Aarushi #Hwnewsmarathi #Maharashtra #Jalgaon #MaharashtraFlood #Adivasi #Tribal

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय राऊतांच्या लेकीच्या साखरपुड्याला राज ठाकरे का आले नाहीत ?

News Desk

#Elections2019 :Know Your ‘Neta’,Mumbai North East | मुंबई उत्तर पूर्व मतदार संघ , तुमचा नेता कोण ?

Atul Chavan

What’s in a name? | नावात काय आहे ?

News Desk