HW News Marathi
व्हिडीओ

अहमदनगरमध्ये जल्लोष करणाऱ्या कार्यकर्त्यांवर लाठीमार

सोमवारी अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतमोजणी सुरु असताना मत मोजणी केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे पोलिसांनी जोरदार लाठीमार केला. पोलिसांच्या अंगावर रंग उधळल्यामुळे हा लाठीमार केला असल्याचे सांगितले जात आहे.

मत मोजणी केंद्राबाहेर हजारो लोक जमले होते. उमेदवार निवडून येताच कार्यकर्ते जल्लोष करीत गुलाल उधळत होते. त्याचवेळी एका उमेदवाराच्या निवडीचा जल्लोष सुरु असताना कार्यर्त्यांनी उधळलेला गुलाल पोलिसांच्या अंगावर पडला. त्यामुळे पोलिसांनी जोरदार लाठीमार केला. लाठीमार होताच जमावाने मिळेल त्या दिशेने धूम ठोकली. या लाठीमारात काहीजण जखमी झाल्याची माहीती आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जिल्हा परिषद शाळेतले आंतरराष्ट्रीय दर्जाचे बालाजी जाधव गुरूजी !

News Desk

आदित्य ठाकरेंनी सांगितला ‘भारत जोडो’ यात्रेतला अनुभव

News Desk

पंकजा मुंडेंना थेट अमित शहांचा फोन…! नेमकं काय झालं?

News Desk