HW Marathi
News Report

अंगणवाडी सेविकांना कधी न्याय मिळेल ?

केंद्र सरकारच्या कामागारविऱोधी धोरणाला विरोध करण्यासाठी काल आणि आज (८ आणि ९ जानेवारी) अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांनी आंदोलन केले. आज संपाचा दुसरा दिवस आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून अंगणवाडी सेविका आणि शिक्षिका आपल्या मागण्यांसाठी आझाद मैदानात आल्या होत्या. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी नुसार अंगणवाडी कर्मचार्‍यांना दरमहा अठरा हजार रुपये वेतन देण्यात यावे , अंगणवाडी कर्मचारी करीत असलेल्या कामाचे आठ तास मोजून त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्यांचे सर्व लाभ देण्यात यावे अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.

Related posts

राम कदमांच्या वक्तव्याचा महिलांनी घेतला खरपूस समाचार…

पूनम कुलकर्णी

Pankaja Munde vs Navab Malik | राष्ट्रवादीचा समारोप करणार!

News Desk

Dr. Amol Kolhe and Shivsena | कोल्हेकुई करा, निवडणुक मीच जिंकणार!

News Desk