उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीची तयारीने वेग घेतला आहे. काँग्रेस सुस्त पडलेली असताना भाजपने मुख्यमंत्र्यांपासून आमदारांच्या कामाचा आढावा आणि मतदारसंघातील वातावरणाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. याचबरोबर आज भाजपने काँग्रेसला जोरदार झटका देण्याची मोठी तयारी केली आहे. काँग्रेसचा मोठा चेहरा असलेले जितिन प्रसाद यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे. कंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्ष प्रवेश केला आहे.काँग्रेसचे दिग्गज नेते म्हणून ओळखले जाणारे जितीन प्रसाद आज भारतीय जनता पक्षात सहभागी होणार असल्याचे संकेत काही दिवसांपूर्वीच दिले होते. तसेच, जितीन प्रसाद यांनी आज गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतल्याची माहिती मिळत आहे. #jitinprasad #bjp #congress #piyushgoyal #rahulgandhi #jpnadda #narendramodi #priyankagandhi
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.