HW Marathi
व्हिडीओ

Bhaskar Jadhav After Joining Shivsena | ‘माझा अंतरात्मा शिवसेनेचा,म्हणून घरवापसी ‘


मी मूळचा शिवसैनिक आहे. माझा अंतरात्मा शिवसेनेचा आहे’ त्यामुळे माझा मूळ स्वभाव स्वस्थ बसू देत नसल्याने मी पुन्हा स्वगृही शिवसेनेत आलो आहे,” असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते भास्कर जाधव यांनी आज शिवसेना प्रवेशानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत माजी मंत्री भास्कर जाधव यांनी आज दुपारी शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरे यांनी जाधव यांच्या हाती भगवा देत शिवबंधन बांधले. भास्कर जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे.
BhaskarJadhav #SharadPawar #BalasahebThackeray #UddhavThackeray #Shivsena

Related posts

पंधरा दिवसांत मिळणार मराठा समाजाला आरक्षण !

News Desk

Budget 2019 | अर्थसंकल्प २०१९..“सबका भला होगा”, पण कसा ?

News Desk

काळ्या पैश्याबाबत सरकारची “हाताची घडी तोंडावर बोट”

News Desk