HW News Marathi
व्हिडीओ

BJP- Shivsena And Nanar Refinery | नाणार प्रकल्प होण्याबाबत मुख्यमंत्र्यांचे संकेत..युतीतं फूट?

आरे शेडचंदेखील नाणार होणार असल्याचं विधान करत उद्धव ठाकरेंनी दबावतंत्राची भाषा केल्यानंतर, नाणारमध्येच पुन्हा रिफायनरी प्रकल्प सुरू करण्याची भाषा मुख्यमंत्र्यांनी केलीय. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा कोकणात दाखल झाली आहे. रत्नागिरीमध्ये महाजनादेशच्या रथावरून बोलताना देवेंद्र फडणवीसांनी नाणारमध्ये रिफायनरी प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात प्रस्ताव बोलून दाखवला आहे. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी सकारात्मक घोषणा सुरू केल्या. दरम्यान लोकसभा निवडणुकांपूर्वी युती करताना शिवसेनेनं नाणारमधून रिफायनरी प्रकल्प हटवण्याची अट घातली आणि तसं करण्यासाठी भाजपला भाग पाडलं. मात्र विधानसभेपूर्वी शिवसेनेनं आरेवरून दबावाचं राजकारण सुरू केलं असताना, मुख्यमंत्र्यांनी नाणारसंदर्भात मोठं विधान केलं आहे. स्थानिक नागरिक आणि शिवसेनेच्या विरोधाच्या रेट्यामुळे रद्द करण्यात आलेला नाणार रिफायनरी प्रकल्प नाणारमध्येच करण्याबाबतचे संकेत देवेंद्र फडणवीस यांनी राजापूर येथे दिले आहेत.#NanarProject #DevendraFadnavis #Shivsena #BJP #UdhhavThackeray

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BJP चं टार्गेट ‘बारामती’,Sharad Pawar यांच्या बालेकिल्ल्याला धक्का देण्याची तयारी

Manasi Devkar

“50 खोके आणि गद्दारीचं उत्तर आमच्या मेळाव्याच्या गर्दीतून देऊ” : Uday Samant

Seema Adhe

विवेक फणसाळकर आजपासून मुंबईचे नवे पोलीस आयुक्त

Manasi Devkar