HW News Marathi
व्हिडीओ

कंगनाविरोधातील कारवाई सूडबुद्धीने !, उच्च न्यायालयाचा मुंबई मनपाला दणका

मुंबई महापालिकेने कंगनाच्या कार्यालयावर केलेली कारवाई अवैध असल्याचा निकाल आज मुंबई हायकोर्टाने दिला. यासोबत नुकसान भरपाईचे आदेशही दिले आहेत. यासाठी झालेल्या नुकसानाचे मुल्यांकन करण्यासाठी सर्वेक्षण अधिकारी नेमण्यास कोर्टानं सांगितलं आहे व त्याचा अहवाल मार्च २०२१ पूर्वी सादर करावा लागणार आहे. पण मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबई महापालिकेने केलेली कारवाई नियमानुसारच केली असल्याचं ठाम मत व्यक्त केलं आहे. मुंबई हायकोर्टाने आज दिलेल्या निकालानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी पालिकेच्या कायदेशीर बाजू पाहणाऱ्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. कंगनाच्या याचिकेवर हायकोर्टाने दिलेल्या निकालानंतर पुढील रुपरेषा या बैठकीत ठरविण्यात येणार असल्याचं कळतं.

#KanganaRanaut #UddhavThackeray #SanjayRaut #BMC #MumbaiHighCourt #MahaVikasAghadi #Shivsena #Maharashtra #Bollywood #MumbaiPolice

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Eknath Shinde यांची पक्षप्रमुख पदाकडे वाटचाल?

News Desk

संभाजीराजे केंद्राची मदत घेण्यास तयार, मराठा आरक्षणासाठी घटनादुरुस्ती होणार?

News Desk

Ranajagjitsinha-Padamsinh Patil | ठरलं ! राणाजगजितसिंह पाटील भाजपमध्ये जाणार

Gauri Tilekar