HW News Marathi
व्हिडीओ

बिल्डर लोढा न्यायालयाला धोका देतायत का ?

भारतातील महत्वाच्या शहरांपैकी एक म्हणजे मुंबई शहर. अलिकडच्या काही वर्षांत मुंबईमध्ये झपाट्याने बदल होताना पहायला मिळत आहेत. पुर्वीच्या काळी गिरणगावात असलेल्या छोट्या छोट्या चाळी पाडून आता त्या ठिकाणी मोठ मोठे टॉवर उभे राहीले आहेत. ज्या मुंबईत एकेकाळी मराठी माणसांची वस्ती होती त्या मुंबईत आता मराठी माणसाला रहाणे देखील परडत नाही. ज्या मराठी मणासाच्या हक्काच्या जागा आहेत त्याही बिल्डर पुर्नविकासाच्या नावावर गिळंकृत करताना पहायला मिळत अशी एक जागा म्हणजे वरळीकरांच्या हक्काचे सांस्कृतिक कलाकेंद्र असलेले गिता सिनेमागृह.

२००६ साली पुर्नबांधणीच्या नावावर वरळीचे हे गिता सिनेमागृह लोढा बिल्डरने हस्तगत केले. गेल्या ६ वर्षांपासून या चित्रपटगृहाची इमारत बांधून सज्ज आहे. मात्र सर्वसामान्यांनी या ठिकाणी फिरकू देखील नये यासाठी इमारतीला कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हे चित्रपटग्रृह पुन्हा एकदा सुरु करण्यात यावे अशी मागणी वरळीकर करत आहेत.

वरळीसारख्या उच्चभ्रू वस्तीत मोक्याच्या ठिकाणी असलेली ही इमारत पाहिली तर सर्वसामान्यांना घाम फुटल्याशिवाय रहात नाही. सामान्य नागरीकांना तुच्छ मानणारे बिल्डर लोढा या ठिकाणी पुन्हा चित्रपटगृह सुरु करणार का ? जे लोक पैसा आणि सत्तेच्या जीवावर न्यायालयाच्या नियमांची पायमल्ली करतात ते सामान्य जनतेच्या मागण्यांना काय भीक घालणार.

एकेकाळी मुंबईच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारी ही वास्तू आता पुर्णत: नष्ट झाली आहे. सध्या त्या ठिकाणी एक बिझनेस हब उभे राहिले आहे. त्यामुळे सर्व सामान्य मराठी माणसाच्या मनोरंजनाला आता जागाच उरलेली नाही. एकेकाळी अनेक गाजलेल्या चित्रपटांची साक्ष देणारे गीता सिनेमागृह गेले कुठे प्रश्न आता वरळीकरांना पडला आहे. याचे उत्तर सामान्य जनतेला आमदार मंगल प्रभात लोढा देणार का ? हे पहाण येत्या काळात महत्वाचे ठरणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

PM Modi Giving Up Social Media | ‘या’ कारणांमुळे पंतप्रधान सोशल मिडीया सोडणार ?

Arati More

Ajit Pawar | सिंचन घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे शपथपत्र दाखल

Gauri Tilekar

Raju Parulekar Show EP 11 | देशातल्या विरोधी पक्षांचं चुकतंय कुठे ? | Farmers Protest | Bharat Bandh

News Desk