HW Marathi
व्हिडीओ

Chandrakant Patil from kothrud | मी परका नव्हे, कोथरूडकरांचाचं…


भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आणि सर्वात सुरक्षित मतदारसंघ अशी ओळख असलेल्या कोथरूड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली गेली आहे. त्यांच्या नावाला विरोध सुरू झाला आहे.‘दूरचा नको, घरचा पाहिजे, आमचा आमदार कोथरूडचा पाहिजे’ असे फलक कोथरूड परिसरात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून लावण्यात आले असून ब्राह्मण संघटनांकडूनही ब्राह्मण उमेदवारच द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे कोथरूड मतदारसंघातील उमेदवारीचा वाद चिघळल्याचे चित्र आहे. मात्र चंद्रकांत पाटील यांनी म्हटलयं की आपण कोथरूडकरांनी परके नाही ,त्यामुळे ते त्यांना जरूर स्विकारतील. #ChandrakantPatil #BJP #Kothrud #BhrahmanMahasangh

Related posts

शहरात नाताळ सण उत्साहात साजरा

धनंजय दळवी

Exclusive Arvind Bhosale| अरविंद भोसलेंनी का घेतली नारायण राणेंना हरविण्याची शपथ ?

आरएसएस-व्हीएचपी मोदींच्या विरोधात होते | Zafar Sareshwala

News Desk