HW News Marathi
व्हिडीओ

..तरच ‘मनसे’सोबत जाणार ! चंद्रकांत पाटलांनी घातली ‘ही’ अट

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी राजकारणातील सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. यावेळी महापालिकेवर भाजपचा भगवा फडकेल, अशी गर्जना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यानंतर शिवसेनेनं त्यांना प्रत्युत्तर दिलं. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते प्रविण दरेकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबतच्या युतीबद्दल उत्सुकता वाढवणारं विधान केलं. यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसेसोबतच्या युतीबद्दल पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी काल (२२ नोव्हेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मनसे सोबतच्या युतीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे हे जनतेच्या प्रश्नांवर तळमळीनं रिऍक्ट होतात. पण आमचं परप्रांतियांबाबतचं धोरण ते स्वीकारणार नाहीत. त्यांनी त्यांचं धोरण बदलायला हवं. त्यांनी परप्रांतियांबाबतची भूमिका बदलल्याशिवाय मनसेशी युती होऊ शकत नाही, असं पाटील म्हणाले. मराठी माणसाला नोकऱ्या मिळायलाच हव्यात. त्याबदल दुमत नाही, हेदेखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.

#RajThackeray #ChandrakantPatil #UddhavThackeray #BMC #BJP #MNS #Shivsena #Maharashtra #SanjayRaut #MumbaiMayor

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Nirmala Sitaraman यांनी अर्थसंकल्पात सादर केलेले महत्त्वाचे मुद्दे

News Desk

धमक्या देऊन थायलंड आणि बँकॉकमध्ये पैसे जमा करायला सांगायचे; Sanjay Raut यांचा आरोप

News Desk

सर्वाच्या मनामध्ये सकारात्मक परिवर्तन करणे हे सरकार निश्चित करेल!- Devendra Fadnavis

News Desk