HW News Marathi
व्हिडीओ

Chatrapati Sambhajiraje Airport | पुरंदरमध्ये विमानतळाला आमच्या जमिनी देणार नाही…

पुणे | पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने आंतरराष्ट्रीय प्रवासी व कार्गो विमानतळ होवू पाहतेय. खरे तर हे विमानतळ याआधी पुणे जिल्ह्यातीलच चाकणच्या परिसरात होणार होते. मात्र, त्याठिकाणच्या स्थानिकांच्या प्रखर विरोधानंतर हे विमानतळ पुरंदर तालुक्यात आले. विमानतळासाठी पारगाव मेमाणे, मुंजवडी, खानवडी, कुंभारवळण, ऐखतपूर, उदाचीवाडी, वनपुरी या सात गावातील जमीन अधिग्रहित केली जाणार आहे. मात्र, विमानतळासाठी एक इंच ही जागा शासनाला देणार नाही प्रसंगी आत्मदहन करू असा आक्रमक पवित्रा बाधित ग्रामस्थांनी घेतला आहे. खरे तर या सात गावांचा विमानतळाला विरोध का आहे.. त्यांचं नक्की काय म्हणणं आहे हे आज आपण या स्पेशल रिपोर्ट मधून जाणून घेणार आहोत.

छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदर असे या होऊ घातलेल्या विमानतळाचे नाव असून विमानतळासाठी सात गावातील २८३२ हेक्टर म्हणजेच सुमारे साडेसात हजार एकर जमीन अधिग्रहित होणार असून सतरा ते अठरा हजार लोक विस्थापित होणार आहेत. पुरंदर तालुका सीताफळ, अंजीर या फळबागांसाठी प्रसिद्ध असून या बागांवर आता बुलडोझर फिरणार आहे. सध्या या क्षेत्राचे सर्व्हेक्षण झाले असून जमीन अधिग्रहित करायला सुरुवात झालेली नाही किंवा शेतकऱ्यांना काय मोबदला मिळणार या बद्दल ठोस माहिती दिलेली नाही. मात्र आतापासूनच शेतकऱ्यांनी या प्रक्रियेला विरोध केला आहे. ग्रामस्थ अधिकाऱ्यांना पिटाळून लावत आहेत. त्यांचे मोजणीचे साहित्य ग्रामस्थ जप्त करत आहेत. पंधराशे च्या वर लोकांनी लेखी हरकती कळवल्या आहेत. विमानतळ झाल्यावर विकास होणार असेल तर तो विकास तुम्हालाच लखलाभ. प्रसंगी मरण पत्करू पण काळ्या आईचा सौदा करणार नाही असा बाणा ग्रामस्थांचा आहे.

 

दुसरीकडे मात्र पुरंदरचे आमदार व राज्यमंत्री विजय शिवतारे विमानतळासाठी प्रचंड आग्रही आहेत. किती ही विरोध झाला तरी विमानतळ होणारच अशी त्यांची भूमिका आहे. विमानतळ होणार म्हणून शिवतारे यांनी त्यांच्या कुटुंबियांच्या नावे शेजारील गावांत हजारो एकर जमीन खरेदी केल्याचे समोर येत आहे. शिवतारे यांनी खरेदी केलेल्या जमिनीला सोन्याचा भाव मिळावा यासाठी तर विमानतळाचा अट्टाहास नाही ना हा ही प्रश्न आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Bharat Jodo यात्रेनंतर ‘हात से हात जोडो’ अभियान; Prithviraj Chavan यांची माहिती

News Desk

Arvind Sawant On Aditya Thackeray | वरळीला मातोश्रीचा उमेदवार भेटला हे वरळीचे भाग्य..

Arati More

Sambhaji Raje विरुद्ध सामान्य कार्यकर्ता; काय आहे ShivSena चा डाव?

News Desk