HW News Marathi
व्हिडीओ

बंडातात्या कराडकरांना भोवले Sule, Munde अन् पवारांबद्दलचे अपशब्द; माफीनाम्यानंतरही कारवाईला वेग

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात आपण पाहतोय कि कशा पद्धतीने ‘मद्यनाट्य’ पेटलंय. सुपरमार्केटमध्ये वाइन विक्री करण्याच्या ठाकरे सरकारच्या निर्णयाविरोधात विरोधकांकडून अत्यंत बोचऱ्या टीका झाल्या आहेत, सुरु आहेत आणि सत्ताधारी-विरोधकांमध्ये यावरून सातत्याने जुंपत आहे. आणि आता नुकतेच या सगळ्या प्रकरणी भाष्य करताना राज्यातील नेत्यांबाबत आणि महिला नेत्यांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर अडचणीत आले आहेत. गुरुवारपासून चर्चेत आलेले बंडातात्या कराडकर आता चांगलेच अडचणीत सापडले आहेत. कारण, वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी आता कराडकर यांना सातारा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बंडातात्या कराडकर यांनी साताऱ्यात सुपरमार्केटमध्ये वाइन विक्री करण्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन करताना दारु तसंच राजकीय नेत्यंसंबंधी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे त्यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करण्यात येत होता. आज यावरून राष्ट्रवादीकडून तर राज्यभरात आंदोलन देखील केलं जात आहेत. त्याचसोबत कराडकर यांच्यावर गुन्हा दाखल न झाल्यास कोर्टात जाऊन खटला दाखल करण्याचा इशारासुद्धा दिला आहे आणि याच पार्श्वभूमीवर हे संपूर्ण प्रकरण सविस्तरपणे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं.

#SupriyaSule #BandatatyaKaradkar #बंडातात्याकराडकर #PankajaMunde #AjitPawar #UddhavThackeray #MVA #Wine #ThackerayGovernment #MaharashatraPolitics

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sharad Pawar NCP | राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्याला अत्यल्प प्रतिसाद, आमदारांचीही अनुपस्थिती

Gauri Tilekar

#Elections2019 :Know Your ‘Neta’,kalyan | कल्याण मतदार संघ , तुमचा नेता कोण ?

Atul Chavan

महाराष्ट्राच्या ‘लालपरी’ची व्यथा; शासन आदेशानंतरही नाराज ST कर्मचाऱ्यांचा संप सुरूच

News Desk