HW News Marathi
व्हिडीओ

खडसेंच्या प्रवेशाने राष्ट्रवादीला फायदा की फटका ? भाजप-शिवसेना-काँग्रेसचं काय?

खडसे राष्ट्रवादी कॅंाग्रेसमध्ये जाणार की नाही जाणार ? ही चर्चा आता जवळजवळ संपुष्टात आली आहे.कारण त्यांचे समर्थक उदयसिंह पाडवी यांनी नवरात्रीच्या पहिल्या माळेला म्हणजे पहिल्या दिवशी खडसे पक्षांतर करणार असा दावा केला आहे. एकनाथ खडसेहे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. खडसे साधारण चार दशकांपासून भाजपमध्ये सक्रिय आहेत. एक लोकनेता आणि भाजपचा बहुजन चेहरा अशी खडसेंची ओळख आहे.

राष्ट्रवादीसाठीही खडसेंना पक्षात घेणं हे सोपे नसेल. खडसेंमुळे आपले महत्त्व कमी होण्याचा फटकाही काही नेत्यांना बसू शकतो. याच संपूर्ण पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांनुसार उद्या म्हणजेच १७ ऑक्टोबर खडसे आपल्या काही समर्थक, जवळपास ३५ आजी-माजी आमदारांसह राष्ट्रवादीत प्रवेश करतील. भाजपसाठी हा निश्चित मोठा धक्का असेल त्यामुळे तसे होऊ नये म्हणून आताही भजपतील बडे नेते खडसेंच्या मनधरणीचे प्रयत्न करतील. मात्र, आता खडसे काय निर्णय घेतात ? हे पाहणे महत्त्वाचं.

#EknathKhadse #SharadPawar #DevendraFadnavis #ChandrakantPatil #AjitPawar #UddhavThackeray #BalasahebThorat #UdaySamant #Congress #Shivsena #NCP #BJP #Maharashtra
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मुळात फसव्या लोकांना सगळं फसवंच वाटणार”; Nana Patole यांची भाजपवर टीका

News Desk

Modi Government |अंतिम बजेटमध्ये करणार या घोषणा ?

News Desk

Acid ची धमकी देत निकटवर्तीयाकडून वर्षभर तरुणीवर बलात्कार; Chembur मधील धक्कादायक प्रकार

News Desk