HW News Marathi
व्हिडीओ

शेतकऱ्यासांठी अस्वस्थ करणारी रात्र ! मका नोंदणीसाठी हजारो जण रात्रभर ताटकळत

सोमवार म्हणजे २ नोव्हेंबरपासून शासकीय मका खरेदी नोंदणी चालू झाली आहे. त्यासाठी शेतकरी हे एक दिवस आधीच बुलढाण्यातील मोताळा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल झाले होते. मात्र, या ठिकाणी हजारो शेतकरी रात्रभर उघड्यावरती अंथरूण-पांघरूण घेऊन पाहायला मिळाले. खरंतर गेल्या वर्षी अनेक शेतकऱ्यांनी शासकीय मका खरेदीमध्ये आपला मका विकण्यासाठी नाव नोंदणी केली होती. मात्र, तेव्हा हजारो शेतकरी याठिकाणी वंचित राहिले होते. त्यामुळे यंदाही अनेक शेतकऱ्यांना अशी भीती वाटत होती कि यावर्षी सुद्धा असाच प्रकार होईल. त्यामुळे लवकरात लवकर आपली नोंद घेऊन आपला मका विकला जावा या साठी २ दिवस आधीच शेतकरी या मार्केटमध्ये रांगेत दिवस-रात्र उभे असलेले पाहायला मिळाले. मात्र शासनाचा नियोजनाचा अभाव पाहायला मिळाला. शासनाकडून इथे शेतकऱ्यांची कुठलीच व्यवस्था केलेली दिसली नाही. त्यामुळे एकीकडे बळीराजा नैसर्गिक संकटांना तोंड देत असताना दुसरीकडे शासनाकडून देखील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांचे हाल होत आहेत. दरम्यान, आमचे बुलढाण्याचे प्रतिनिधी शिवाजी म्हामणकर यांनी या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

#MahaVikasAghadi #Buldhana #FarmersInMaharashtra #UddhavThackeray #SharadPawar #Farmers #RajuShetti #CMOMaharashtra #CMUddhavThackeray #NCP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘त्या’ रात्री नक्की काय घडलं? कोरियन युट्यूबरची पहिली प्रतिक्रिया

Chetan Kirdat

sanjay nirupam vs Milind deora | घरोघरी मातीच्या चुली

News Desk

विनायक मेटे यांचं निधन हे महाराष्ट्राचं नुकसान – Nitin Gadkari

News Desk