HW News Marathi
व्हिडीओ

बीडमध्ये स्त्री जन्मदर घटण्यास कोण जबाबदार? सर्वसामान्य की प्रशासन?

काहीच दिवसांपूर्वी आम्ही एक बातमी दाखवली होती. हि बातमी होती बीडमधील ३ तालुक्यांत धक्कादायक प्रमाणात घातलेल्या स्त्री जन्मदराची. यापूर्वी स्त्री भ्रूण हत्या प्रकरणात बीड (Beed District) जिल्ह्याचे नाव देशात गाजलं होतंच आणि आता पुन्हा एकदा याच जिल्ह्यात मुलींच्या जन्माचा दर अत्यंत कमी आल्याचा धक्कादायक आकडा समोर आला आहे. कोव्हिड काळात (Covid-१९) मुलींच्या जन्मदरात (Girl Child Ratio) मोठी घट झाल्याचे समोर आल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. बीडमधील पाटोदा, केज आणि परळी या ३ तालुक्यांत हि भीषण स्थिती निर्माण झालीयेपाटोदा तालुक्यात हजार मुलांमागे केवळ ७६४ मुलींचा जन्म झाला आहे. तर त्यापाठोपाठ केजमध्ये ८८८ तर त्यानंतर परळीत ९०३ मुली जन्मल्या. पण अर्थात पातोट्यात हे प्रमाण सर्वात कमी आहे. याच पार्श्वभूमी आम्ही आढावा घेतलाय पाटोद्यात निर्माण झालेल्या या स्थितीमागच्या कारणांचा. म्हणजे मुळात हि स्थिती निर्माण का झाली? सर्वसामान्यांची मानसिकता काय आहे? सामाजिक कार्यकर्ते काय म्हणतायत? प्रशासन काय म्हणताय? आणि मुख्य म्हणजे ह्यावर उपाय काय?

#Beed #DhananjayMunde #PankajaMunde #GirlChildRatio #BeedPolitics #PCPNDT #Abortion #SexSelectionProhibition #FemaleFoeticide

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिवाळीच्या काळात शेतकरी राजा संकटात असल्याने आम्ही चटणी भाकर खाणार! – Sanjay Gaikwad

News Desk

“एखादी चुक एवढी मोठी नसावी की…” एकनाथ खडसेंची उद्धव ठाकरेंसह शिंदेंवर टीका

News Desk

“कदम कुटुंबियांना राजकारणातून उद्ध्वस्त करण्याचा कट ‘मातोश्री’वर रचला गेला”; Ramdas Kadam यांचा आरोप

News Desk