“घाटकोपर च्या आनंद नगर भागात पीडित सात वर्षीय मुलगी वडापाव च्या दुकानात आली होती. तिला या आरोपी ने गोड गोड बोलून तिथून घेऊन गेला.
सुमारे एक ते दीड किमी एका निर्मनुष्य झाडी असलेल्या ठिकाणी तिला नेऊन तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार करून पळ काढला. काही वेळाने त्या ठिकाणी काही नागरिकांनी त्या मुलीला पाहिले आणि पोलीस आणि तिच्या नातेवाईकांना कळविले.पोलिसांनी तात्काळ या मुलीला वैद्यकीय उपचारासाठी दाखल केले आणि या प्रकरणी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक गुन्हा नोंदविला. या प्रकरणी पोलिसांनी आठ टीम तयार करून विभागातील सर्व सीसीटीव्ही खंगळुन काढले. यात पोलिसांना आरोपीचे चित्र मिळाले.यातील सचिन शामा हा घाटकोपर, साकीनाका, पार्कसाईट पोलीस ठाण्यात पाच अश्याच प्रकार च्या गुन्ह्यात आरोपी असून कोव्हिडं काळात कोठडीतून बाहेर आल्याचे पोलिसांना समजले. ”
#Ghatkopar #Crime #MumbaiPolice #PoliceStation #Rape #Justice #SanjayPandey #VishwasNangrePatil#HWNews
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.