संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांनी पुणे लोकसभा मतदारसंघासाठी जोरदार तयारी केल्याचं दिसत आहे. प्रवीण गायकवाड यांनी काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांचीही भेट घेतली होती त्यांनतर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. पुणे लोकसभेची जागा काँग्रेसच्या वाट्याला आहे. त्यामुळे काँग्रेसकडून तिकीट मिळवण्यासाठी प्रवीण गायकवाड यांनी काँग्रेस नेत्यांच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत.आयात उमेदवार दिला जाऊ नये अशी एकमुखी मागणी, काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी केली. त्यामुळेच या मतदारसंघाचा घोळ सोडवण्याची जबाबदारी आता काँग्रेसच्या शिष्ठमंडळावर आहे .आज मुंबईमधे पुण्याचा निकाल लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपने गिरीश बापट यांच्या रूपाने ब्राह्मण उमेदवार दिला आहे ,आता काँग्रेस प्रवीण गायकवाड या मराठा उमेदवाराला उमेदवारी देऊन जातीय राजकारणाची खेळी खेळणार का याच आज उत्तर मिळेल.
#Congress #BJP #Loksabha2019 #Pune
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.