HW News Marathi
व्हिडीओ

Imtiyaz Jaleel Vs Shivsena | इम्तियाज जलील हे निजामांचे गुलाम..शिवसेनेची टिका!

आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे. मात्र खासदार इम्तियाज जलील आजही संभाजी नगर येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमाला गैरहजर राहिले, यावरून त्यांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे वावडे असल्याचे दिसते,” अशी टीका शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी केली आहे. स्वतःला निजामाचे वारस समजणाऱ्या जलील यांनी आपल्या आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणीदेखील त्यांनी यावेळी केली आहे.“गेले अनेक वर्षे आमदार असतानाही आणि आता खासदार असताना देखील इम्तियाज जलील हे या कार्यक्रमाला गैरहजर राहिले आहेत. ज्या हुतात्म्यांनी आपले रक्त सांडले आणि निजामाच्या तावडीतून मराठवाडा मुक्त केला, त्या हुतात्म्यांना अभिवादन करणे त्यांना मान्य नाही का? ” असा सवाल मनीषा कायंदे यांनी उपस्थित केला आहे. जलील अजुनही स्वतःला निजामाचे गुलाम समजतात अशी टीका कायंदे यांनी केली.#ImtiyazJaleel #Shivsena #MarathwadaMuktisangram #HydrabadMuktisangram

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Narendra Modi यांच्या ‘त्या’ टीकेवर राज्यातील विरोधक आमने-सामने

News Desk

पंतप्रधानांच्या घरासमोर हनुमान चालिसा, नमाज पठणाची NCPच्या महिला पदाधिकाऱ्याची मागणी

News Desk

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी OBC Reservation सोडत जाहीर,दिग्गजांना फटका बसणार?

Chetan Kirdat