HW News Marathi
व्हिडीओ

शरद पवार,उद्धव ठाकरेंची मराठी माणसाला साद,निवडणुकांची तयारी?

मुंबईच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संकटातही त्यावर मात करण्याची हिम्मत दाखवली, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं होतं. बीडीडी चाळींच्या पुनर्विकासानंतर मिळणारे घर विकू नका. इथे मराठी पाळेमुळे कायम राहतील, त्यांना धक्का लागणार नाही, याची काळजी घ्या. या भागात मराठी टक्का टिकला पाहिजे. मराठीचा आवाज दिसला पाहिजे, अशा सूचक शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईतील मराठी माणसाला रविवारी साद घातली. तर दुसराकडे बीएमसी निवडणूका फेब्रुवारी २०२२ मध्ये होणार आहे. बीडीडी चाळ पुनर्विकासाचा फायदा शिवसेनेला मुंबई महापालिका निवडणुकीत होणार का?

#UddhavThackeray #SharadPawar #CMOMaharashtra #MaharashtraCM #BDDchawl #mumbaimarathi #Marathi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BJP-Shivsena युतीच्या चर्चांना Chandrakant Patil आणि Uddhav Thackeray का हवा देतायतं ? पाहा कारणं

News Desk

“मलिकांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही”; NCP चा पुनरुच्चार

News Desk

भाजपचा दांभिकपणा वेळोवेळी दिसून येतो !, पृथ्वीराज चव्हाणांचा निशाणा

News Desk