HW News Marathi
व्हिडीओ

महाराष्ट्राचं नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्र’ करा! महाविकासआघाडीच्या नेत्याने अशी मागणी का केली?

शहारांची नावं बदलण्याची मागणी जोर पकडत असतानाच महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देणाऱ्या समाजवादी पक्षानंही स्पष्ट भूमिका मांडत नामांतराला विरोध दर्शवला आहे. सपाचे नेते आमदार अबू आझमी यांनी एका व्हिडीओद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आवाहन केलं आहे. “शहरांची नावं बदलून कुणाचं पोट भरत नाही. शहरांना आवडीचं नाव ठेवायचंच असेल, तर नवी शहरं वसवून ठेवा. अहमदनगर किंवा औरंगाबादला एक इतिहास आहे. तो बदलून जबरदस्तीनं नामांतर करणं योग्य नाही. नामांतर करायचंच असेल, तर आधी महाराष्ट्राचं नाव बदलून राज्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्या. रायगडचं नाव बदलून संभाजी महाराजांचं नाव द्या. लोकांनाही ते आवडेल. मात्र, केवळ काही लोकांना डिवचण्यासाठी नामांतर करणं हे आपल्याला शोभत नाही,” असं आवाहन अबू आझमी यांनी केलं आहे.

#UddhavThackeray #AbuAzmi #ChhatrapatiShivajiMaharaj #Maharashtra #MahavikasAghadi #Congress #BalasahebThorat #NCP #Shivsena #SanjayRaut

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BJP MLA Charan Waghmare | भाजप आमदाराला विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक

Gauri Tilekar

Eknath Khadse| “सभागृहातला मी सर्वात भ्रष्ट आमदार” – खडसे विधानसधेत भावनिक..

Arati More

कुटुंब नियोजन किटमध्ये ‘रबरी लिंग’; आशा सेविका सरकारवर नाराज, नेमकं प्रकरण काय?

News Desk