HW Marathi
व्हिडीओ

ठाकरे सरकारने मराठा विद्यार्थ्यांचा घात केला!, ‘त्या’ निर्णयामुळे मराठा समाज आक्रमक

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने रखडलेले सर्व शैक्षणिक प्रवेश सुरू करण्याचा राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. SEBC प्रवर्गासाठी आरक्षण न ठेवता शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. ९ सप्टेंबर २०२० नंतरचे सर्व प्रवेश SEBC वर्गासाठी आरक्षित न ठेवता करण्याचा ठाकरे सरकारनं निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभुमीवर आता मराठा समाज मोठ्या प्रमाणात आक्रमक झाला आहे. मराठा क्रांती मोर्चाचे नेते विनोद पाटील यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. राज्य सरकारने मराठा विद्यार्थ्यांचा घात केलाय, असे विनोद पाटील म्हणाले. तर “विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान थांबविता येणार नाही. SEBC मधून अ‍ॅडमिशन घेता येणार नाही, त्याऐवजी खुल्या प्रवर्गातून प्रवेश घेता येईल”, असं सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले आहेत. मुंबईत ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. “मराठा आरक्षणाला स्थगिती देणार नाही, चुकीचा गैरसमज काही संघटना मुद्दाम पसरवत आहेत, असा खुलासाही अशोक चव्हाणांनी केला आहे. घटनापीठ स्थापन करण्यासाठी चार वेळा लेखी अर्ज सरकारने न्यायालयात केला. न्यायालय तारीख देईल, त्यावर टिपण्णी करणे योग्य नाही”, असंही अशोक चव्हाण म्हणाले आहेत.

#MarathaReservation #UddhavThackeray #AshokChavan #MarathaMorcha #Maharashtra #AcademicDecisions #Exams

Related posts

Narendra Modi -Amit shah and Nitin Gadkari | भाजप हा मोदी- शहांचा पक्ष नाही ..!

Arati More

Ganpati 2019 | करीरोडमध्ये पाईपचा गणपती

Satej Patil,Hasan Mushrif,Balasaheb Thorat | कोल्हापुरला पालकमंत्रीचं मिळेना….! ‘हे’ नेते स्विकारणार का पालकत्व ?

Arati More