HW News Marathi
व्हिडीओ

महानगरपालिकांसाठी ‘मनसे’ सज्ज ! अमित ठाकरेंच्या नेतृत्त्वाची खऱ्या अर्थाने कसोटी ?

राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अमित ठाकरे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाण्याची दाट शक्यता आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज मुंबईत मनसेचे प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी झालेल्या चर्चेत अमित ठाकरे यांना सक्रिय राजकारणात उतरवण्याविषयी चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

या बैठकीत राज ठाकरे यांनी मनसेचे प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांशी वैयक्तिकरित्या संवाद साधला. यावेळी राज्याच्या प्रत्येक भागातील राजकीय व सामाजिक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर राज ठाकरे यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी सर्व नेत्यांना जोमाने कामाला लागण्याचे आदेश दिले.

मनसे’कडून प्रत्येक महानगरपालिका क्षेत्रासाठी सरचिटणीस आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची समिती तयार केली जाणार आहे. या सगळ्या समित्यांचा कारभार हाताळण्याची जबाबदारी अमित ठाकरे यांच्यावर सोपविली जाण्याची दाट शक्यता आहे. यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी येत्या दोन-तीन दिवसांमध्ये मनसेची आणखी एक बैठक होणार आहे.

#AmitRajThackeray #RajThackeray #MNSAdhikrut #MunicipalElection #BJP #Shivsena #Congress #NCP #MahaVikasAghadi
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चंद्रकांत पाटील यांच्यावर पुण्यात शाईफेक, नेमकं काय घडलं

Chetan Kirdat

Devendra Fadnavis यांनी Congress ला दिली खुली ऑफर !

News Desk

शरद पवार,उद्धव ठाकरेंची मराठी माणसाला साद,निवडणुकांची तयारी?

News Desk