HW Marathi
व्हिडीओ

लोकल सुरू होईना ! अनेक विनवण्यांनंतर आक्रमक ‘मनसे’ करणार ‘सविनय कायदेभंग’ | MNS | Mumbai Local

 

मुंबईची लाईफलाईन असणारी लोकल लवकर सुरु करा, अशी मागणी सगळ्यांकडून केली जात आहे. विशेषतः उपनगरात राहणाऱ्या नागरिकांकडून ही मागणी होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर येत्या २१ सप्टेंबरला जनतेच्या हितासाठी मनसेचा रेल्वे प्रवास असे आंदोलन मनसेतर्फे केले जाणार आहे. मनसे सरचिटणीस संदिप देशपांडे, मनसे नेते संतोष धुरी यांनी याबाबतची माहिती दिली.

“लॉकडाऊनमध्ये रेल्वे सेवा बंद आहे. मात्र बससेवा सुरु आहे. पण बसमध्ये प्रचंड हाल होत आहे. जवळपास आठ तास लोकांना घरी जाण्यासाठी लागत आहे. लोकांचे हाल बघवत नाही. वारंवार विनंती करुन सरकार रेल्वे सेवा सुरु करत नाही. त्यामुळे कल्याण, डोंबिवली, पालघर या ठिकाणाहून येणाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. विनंती करुन सरकार ऐकत नाही. त्यामुळे येत्या सोमवारी मनसेतर्फे सविनय कायदे भंग करत आम्ही रेल्वे प्रवास करणार आहे,” असे मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.

#MNS #MumbaiLocal #Lockdown #RajThackeray #UddhavThackeray #SandeepDeshpande #AnilParab #MNSAdhikrut  #Mumbai

Related posts

Nirmala Sitharaman on Onion Prices | काळजी करु नका, मी कांदा खात नाही !

Gauri Tilekar

Harshvardhan patil |निष्क्रिय कारकीर्द झाकण्यासाठी माझ्यावरच पाण्याचे आरोप – हर्षवर्धन पाटील

Arati More

Chetan Tupe NCP Pune | भ्रष्टाचाऱ्यांना लोकांनी धडा शिकवला !

Gauri Tilekar