HW News Marathi
व्हिडीओ

Mumbai Rains | पहिल्याच पावसात मुंबईला लागला ब्रेक

गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईकर पावसाची वाट पाहत होते. अखेर मुंबई शहर आणि उपनगरात आज (२८ जून) सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबईत आज दमदार पाऊस होण्याची शक्यता स्कायमेटने त्याच्या ट्वीटरवरून वर्तवली आहे. पावसाच्या आगमनाने मुंबईकर सुखावले आहे. अंधेरी, जोगेश्वरी, बोरिवली, दादर, घाटकोपर, मुलूंड,चर्चगेट अशा पूर्व आणि पश्चिम उपनगरात पाऊस सुरु आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, भिवंडी, कल्याण, नवी मुंबईतही पावसाने हजेरी लावली आहे. जून महिन्याच्या अखेरीस पावसाने हजेरील लावल्याने सर्वजण सुखावले आहेत. पावसाच्या दमदार हजेरीने मुंबईच्या तिन्ही रेल्वे मार्गावर कोणताही परिणाम झाला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्येही जुलै महिना अखेरपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्याने मुंबईकरांवरही पाणीटंचाईचं संकट उभे राहिले आहे. त्यामुळे पावसाने लावलेली ही हजेरी काहीप्रमाणात का होईना पण मुंबईकरांना दिलासा देणारी आहे. #mumbai #rains #Monsoon #skymet #IMD

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मविआच्या मोर्चाला परवानगी मिळाली, पण…” – Anil Parab

News Desk

“50 खोके आणि गद्दारीचं उत्तर आमच्या मेळाव्याच्या गर्दीतून देऊ” : Uday Samant

Seema Adhe

Chagan Bhujbal On Shivsena | शिवसेनेशी भेट हा चांगला योगायोग..

Arati More