HW News Marathi
व्हिडीओ

National Youth Day कलेची सांस्कृतिक युवागिरी

आज राष्ट्रीय युवा दिन, तरूण म्हणजे सळसळती ऊर्जा तरुण म्हणजे नावीन्याचा ध्यास. रुळलेल्या वाटा सोडून वेगळी वाट धरून त्यावर वाटचाल करणारी अनेक तरूण मंडळी आत्मविश्वासाच्या बळावर आपले कर्तुत्व सिद्ध करू पाहताहेत. राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने अशाच काही तरुण-तरुणींची गोष्ट. हिमालय पाटकर याने पाच वर्ष शिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतर चित्रकलेचे शिक्षण घेण्याची संधी चित्रकलेची आवड असणाऱ्या प्रत्येकाला मिळायला हवी असा विचार केला, आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग इतरांना व्हावा या हेतुने गेल्या वर्षी चित्रसुत्रची स्थापना केली. पाच वर्षांपासून ते पासष्ट वर्षांचे विद्यार्थी त्याच्याकडे चित्रकला शिकतात.

तशीच तेजल गोलिपकर हि संस्कृत भाषेचा वारसा जपण्याचा प्रयत्न करीत आहे. 35 वर्षांपासून ते ६० वर्षांपर्यंतच्या लोकांना संस्कृत शिक्षण देण्याच्या तिच्या प्रयत्नात आपली संस्कृत भाषा टिकावी, वाढावी हाच उद्देश आहे. आजच्या युवा दिनानिमित्त जाणुन घेऊया त्यांचा प्रवास.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कंगनाविरोधातील कारवाई सूडबुद्धीने !, उच्च न्यायालयाचा मुंबई मनपाला दणका

News Desk

Kirit Somaiya देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचारी!; Sanjay Raut यांचा गंभीर आरोप

News Desk

Rohit Pawar यांच्या कामात अहिल्याबाईंच्या दृष्टीकोनाचा विचार दिसतोय!– Sharad Pawar

News Desk