HW News Marathi
व्हिडीओ

PMC And Reserve Bank | पीएमसी बॅंकेवर निर्बंध आले,आता पुढे काय?जाणून घ्या

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मुंबईस्थित पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादले आहेत. यानुसार बँकेला नवी कर्ज देणे, ठेवी स्वीकारण्यासह अनेक गोष्टींवर निर्बंध असतील. तर खातेदार केवळ एक हजार रुपये इतकीच रक्कम काढू शकतील.बँकेची सद्यस्थिती पाहता नागरिकांच्या हितासाठी बँकेवर निर्बंध आणणे गरजेचे होते, असे रिझर्व्ह बँकेच्या आदेशात म्हटले आहे. या आर्थिक निर्बंधांचा आदेशानुसार २३ सप्टेंबर पासून बँकेने रिझर्व्ह बँकेच्या मान्यतेशिवाय कोणतेही नवे कर्ज देऊ नये, जुन्या कर्जांचे नूतनीकरण करू नये, बँकेने कोणतीही गुंतवणूक करू नये, तसेच नव्या ठेवी स्वीकारू नयेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचबरोबर बँकेची देणी फेडण्यासाठी देयक अदा करू नये, असे या आदेशात म्हटले आहे.#PMCBank #ReserveBankOfIndia #Mumbai #Maharshtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Ncp वर Pravin Darekar यांच्या टीकेनंतर Rupali Chakankar यांनी घेतला समाचार !

News Desk

‘सोमय्यांसारखी कंबोज यांना प्रसिद्धी हवी असेल’

News Desk

सत्तासंघर्षाचा निकाल Uddhav Thackeray यांच्या बाजूने लागला तर…?

Manasi Devkar