HW News Marathi
व्हिडीओ

अजित पवारांच्या दौऱ्यात बीडमध्ये राडा ! पोलिसांनी केला लाठीचार्ज..

आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले होते. मराठवाड्यात उतर जिल्ह्यांच्या तुलनेत बीड ,उस्मानाबादमध्यै पॅाझिटिव्हीटी रेट जास्त असल्याने आढावा बैठक घेण्यात आलीं. अजितदादा पवारांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात तब्बल 2 तास 30मिनिटे बैठक झाली.ही बैठक संपल्यानंतर मंत्र्यांचा ताफा बाहेर निघाला असता कोविड काळात काम करणाऱ्या कॅत्राटी कर्मच्याऱ्यांनी मोठा गोंधळ केला. निवेदन घेऊन भेटू दिले नाही म्हणून या शेकडो कर्मचाऱ्यांनी दादांचा व राजेश टोपे यांच्या गाड्याांचा ताफा अडवला . मात्र या कर्मचाऱ्यांचे म्हणणे ऐकून न घेताच मंत्र्यांच्या गाड्याचा ताफा पुढे निघाला.या दरम्यान पोलिसांनी या जमावावर लाठीचार्ज देखील केला आहे असा आरोप केला जात आहे. यासंदर्भात भाजपचे आमदार सुरेश धस यांनी देखील कर्मचाऱ्यांवर लाठीचार्ज झाल्याच आरोप केला आणि चौकशीची मागणी केलीये.

#AjitPawar #DhananjayMunde #RajeshTope #SandeepKshirsagar #Beed #Maharashtra #MVA #MahaVikasAghadi #SharadPawar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मृत तरुणीला न्याय देण्यासाठी Ram Kadam यांनी घेतली वरिष्ठांची भेट

Seema Adhe

Raj Thackeray यांच्या सभेवर ‘या’ नेत्यांनी दिला सल्ला

News Desk

मंदिरे बंद, उघडले बार; उद्धवा, धुंद तुझे सरकार ! पुण्यात भाजप आक्रमक

News Desk