HW Marathi
व्हिडीओ

संजय राठोड १५ दिवसांनी माध्यमांसमोर !कार्यकर्त्यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन…

शिवसेना नेते आणि वन मंत्री संजय राठोड पोहरादेवीकडे रवाना झाले आहेत. शासकीय वाहनांऐवजी खासगी गाडीत बसून राठोड पोहरादेवीकडे कुटुंबीयांसोबत निघाले आहेत. त्यांच्यासोबत यवतमाळचे शिवसेना नेतेही असल्याचं सांगितलं. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजपने संजय राठोड यांच्यावर थेट आरोप केले होते. त्यानंतर गेल्या 15 दिवसांपासून संजय राठोड सार्वजनिक ठिकाणी आले नव्हते. ते यवतमाळ येथील त्यांच्या घरीही नव्हते. राठोड काल यवतमाळ येथील त्यांच्या निवासस्थानी आले. आज सकाळीच शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड, माजी आमदार विश्वास नांदेकर, राठोड यांचे मेव्हणे सचिन नाईक आणि त्यांचे नातेवाईक आज राठोड यांच्या निवासस्थानी दाखल झाले. राठोड यांनी आज या नेत्यांशी बराचवेळ चर्चा केली. त्यानंतर ते पोहरादेवीकडे जायला निघाले.

#sanjayrathod #poojachavan #UddhavThackeray #shivsena #mahavikasagahdi #yavatmal #maharashtra

Related posts

Shivsena | 4 वर्षांनी शिवसेनेला मिळणार उपमुख्यमंत्रीपद ?

Arati More

Sharad Pawar Press On ED | ‘ईडीचा पाहुणचार घ्यायला मी स्वत: जाणार’ २७ सप्टेंबरला ईडी कार्यालयात…

Arati More

५ राज्याच्या निवडणूक निकालावरुन मोदींनी धडा घ्यावा

News Desk