पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी अडचणीत सापडलेले संजय राठोड आज पोहरादेवीला जाणार असल्याची अधिकृत माहिती मिळाली. राज्याचे वनमंत्री संजय राठोड हे 23 फेब्रुवारी रोजी वाशिम जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. 23 फेब्रुवारी रोजी 11.30 वाजता श्रीक्षेत्र पोहरागड (ता. मानोरा) येथे त्यांचे आगमन होणार असून, ते दुपारी 1 वाजता धामणगाव देव (ता. दारव्हा)कडे प्रयाण करणार आहेत. मात्र, या पार्श्वभूमीवर पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांचे नवे फोटो व्हायरल होत आहेत. त्यानंतर आता पुन्हा अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
#sanjayrathod #poojachavan #shivsena #yavatmal #maharashtra #arunrathod #uddhavthackeray #mahavikasaghadi