HW Marathi
व्हिडीओ

Pune Marriage Cancelled | कोरोनामुळे जेव्हा लग्नचं पुढे ढकलावं लागत…


आज म्हणजे १९ मार्चला पुण्यात अश्विनी आणि प्रवीण विवाहबद्ध होणार होते. पण कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे त्यांनी लग्नाची तारीख बदलण्याचा निर्णय घेतला आहे. मागील दोन आठवड्यापासून पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. अशावेळी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासन नागरिकांनी एकत्र येण्याचे टाळावे असे आवाहन करत आहे. राजकीय पक्षांचे कार्यक्रम, कौटुंबिक सोहळे, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी लोकांनी एकत्र जमणे विषाणूच्या प्रसारासाठी अनुकूल असल्याने वारंवार अशा कृती टाळण्याविषयी सूचना करण्यात येत आहेत. त्यातच सध्या लग्नसराई असल्याने त्याठिकाणी कमीतकमी नातेवाईक असावेत अशी विनंती करण्यात येत आहे. हाच विचार मनाशी धरून जमदाडे आणि कदम कुटुंबीयांनी हा निर्णय घेतला आहे. 

Related posts

Sharad Pawar Vs Amit Shah | तुमच्यासारखा तुरूंगात गेलो नाही,शरद पवारांचे अमित शहांना प्रत्युत्तर…

Aditya Tripathi

Amol Kolhe and Udaynraj Bhosle | अमोल कोल्हेंनी खा.उदयनराजेंसाठी सोडली शिवसेना !

Arati More

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांची पूरग्रस्तांना “ए तू चूप..” अशी दमदाटी !

Arati More