HW News Marathi
व्हिडीओ

Raju Parulekar Show EP 11 | देशातल्या विरोधी पक्षांचं चुकतंय कुठे ? | Farmers Protest | Bharat Bandh

देशातील शेतकऱ्यांचा मोदी सरकारविरोधातला असंतॊष एकीकडे वाढत चालेल असताना सरकारची असंवेदनशीलता संताप आणणारी वाटते. मोदी सरकारच्या कृषी कायद्याविरोधात तब्बल गेले १२ दिवस शेतकरी दिल्लीच्या सीमांवर ‘सरकारला कधीतरी जाग येईल’ याच प्रतीक्षेत बसले आहेत. याच पार्श्वभूमीवर, आज (८ नोव्हेंबर) शेतकरी संघटनांकडून “भारत बंद”ची हाक देण्यात आली ज्याला महाराष्ट्रासह देशभरातून उस्फुर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले. कोणत्याही राजकीय पक्षाच्या सहभाग नसलेल्या या शेतकरी आंदोलनाला देशभरातील विरोधी पक्षांनी उस्फुर्त समर्थनही दिले आहे. मात्र, याच अनुषंगाने मुख्य प्रश्न निर्माण झालाय तो म्हणजे “देशातल्या विरोधी पक्षांचं चुकतंय कुठे ?” शेतकरी आंदोलनाच्या अनुषंगाने एक गोष्ट पुन्हा एकदा अधोरेखित झाली ती म्हणजे, सबळ विरोधी पक्ष जर भारतात अस्तित्वात असता तर भाजपचे जे केंद्र सरकार आहे त्याला कोणताही निर्णय घेताना १०० वेळा विचार करावा लागला असता. विरोधी पक्षाचा सरकारवर अंकुश राहिला असता. पण ते होत नाही म्हणून देशात वारंवार या प्रकारची स्थिती निर्माण होते. याच मुद्द्यावर, राजकीय विश्लेषक राजू परुळेकर यांचे सविस्तर विश्लेषण जरूर पहा. Raju Parulekar Show EP 11 | देशातल्या विरोधी पक्षांचं चुकतंय कुठे ?

#FarmersProtest #BharatBandh #Congress #BJP #ModiGovernment #RahulGandhi #NarendraModi #ISupportFarmers #FarmLaws #Delhi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sandeep Deshpande आणि Santosh Dhuri यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम; आजही दिलासा नाही

News Desk

अखेर एकनाथ खडसे ED कार्यालयात दाखल ! ‘ही’ ५ वी चौकशी, अडचणी वाढणार ?

News Desk

Brigadier Sudhir Sawant | निर्णायक लढाई करुन पाकीस्तानला नष्ट करा

Atul Chavan