HW Marathi
व्हिडीओ

Ramraje,Udayanraje,Bhaskar Jadhav |उदयनराजे भाजपात,रामराजे आणि भास्कर जाधव शिवसेनेत..


राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले 14 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहा यांच्या उपस्थितीत दिल्लीमध्ये भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. नवी दिल्लीमध्ये उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशाचा सोहळा होणार आहे. विधान परिषदेचे सभापती आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते रामराजे निंबाळकर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रामराजे शिवसेनेच्या संपर्कात होते. उदयनराजेंची भूमिका स्पष्ट न झाल्याने त्यांनी आपला निर्णय राखून ठेवला होता.आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कोकणातील नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव हाती शिवबंधन बांधणार आहेत.#BhaskarJadhav #Shivsena #BJP #Udayanraje #Ramraje

Related posts

Meheboob Shaikh NCP Yuva Congress | …तर मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही !

Gauri Tilekar

धावत्या लोकलसमोर आत्महत्या करण्याऱ्या आईला मुलीने वाचवले

Atul Chavan

दुष्काळाच्या प्रश्नावरुन धनंजय मुंडे विधानपरिषदेत आक्रमक

Atul Chavan