HW Marathi
व्हिडीओ

धनंजय मुंडे प्रकरणावर सेना म्हणते “नो कमेंट्स” तर कॉंग्रेस- राष्ट्रवादीची भूमिका काय?

सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या गायिकेने बलात्काराचा आरोप केला. राजकीय वर्तृळात या गोष्टीने खळबळ माजली आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. सामाजिक न्याय मंत्री मुंडे यांच्यावरील आरोपानंतर त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली असल्याची माहिती आहे. मुंडे यांनी शरद पवार यांची सिल्व्हर ओक इथं भेट घेतली आहे. राज्याचे सामाजिक न्यायविकास मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्याने राज्यात, राष्ट्रवादीत खळबळ उडाली आहे. धनंजय मुंडे यांनी स्वत: फेसबुक पोस्ट लिहत परस्पर सहमतीने करुणा शर्माशी माझे संबंध आहेत तसंच आम्हाला दोन मुलेही आहेत, असं सांगितलं आहे. धनंजय मुंडे यांच्या स्पष्टीकरणानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र या प्रकरणावर काहीही बोलण्यास नकार दिला आहे.

#DhananjayMunde #SharadPawar #AjitPawar #EknathShinde #SachinSawant #JayantPatil #NCP #Shivsena #Congress #Mahavikasaghadi

Related posts

Ajit Pawar NCP | जर आमचा कोणताही आमदार फुटला तर…!

Gauri Tilekar

Sharad Pawar-Baramati | हा राष्ट्रवादीचा विजय, बारामतीकरांच्या भावना….

Arati More

Kumbh Mela 2019 | ४ कोटी भाविकांनी कुंभ स्नान केल्याचा अंदाज

News Desk