HW News Marathi
व्हिडीओ

Sadabhau Khot | ..तर मी भर चौकात फाशी घेईन

कडकनाथ कोंबडीपालन फसवणूक प्रकरणात रविवारी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली. या गैरव्यवहारात माझा सहभाग असल्याचे पुरावे राजू शेट्टी यांनी द्यावेत. हे आरोप सिद्ध झाले तर मी राजकारण कायमचं सोडून देईन. मात्र, पुरावे सादर करता आले नाहीत तर माझ्यावर टीका करणाऱ्यांनी भर चौकात विष्टा खावी, असे सदाभाऊ यांनी म्हटले. कडकनाथ कोंबडीपालन व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची जवळपास ५०० कोटींची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी महारयत ऍग्रो कंपनीचा संस्थापक अध्यक्ष सुधीर मोहिते याच्यासह पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुधीर मोहिते, संदीप मोहिते यांच्यासह कंपनीचे कर्मचारी हनुमंत जगदाळे, विनय शेंडे, एजंट गणेश शेवाळे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. #SadabhauKhot #RajuShetti #KadaknathKombadi #RayatKranti

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“गाजर हलवा असा हा अर्थसंकल्प” – Uddhav Thackeray

News Desk

Eknath Shinde Shivsena | सत्तास्थापनेचे सर्व अधिकार उद्धव ठाकरेंना ..

swarit

Congress चे 10 आमदार बहुमत चाचणीला का हजर नव्हते?, Yashomati Thakur म्हणाल्या…

News Desk