HW News Marathi
व्हिडीओ

Sharad Pawar – Baramati Shut | ‘बारामती बंद’ सरकारच्या विरोधात,पवारांच्या समर्थनार्थ…

राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतर पवार समर्थकांनी आज ‘बारामती बंद’ची हाक दिली आहे. ईडीच्या कारवाई विरोधात बारामती शहरातील बाजारपेठा, दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहेत. बंदच्या पार्श्वभूमीवर शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

बारामती शहराबरोबरच तालुक्यातही बंद पुकारण्यात आला आहे. बारामतीतील शारदा प्रांगणात सकाळी 10 वाजता नागरिकांना निषेध सभेला उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या सभेनंतर ‘बंद’ची पुढील रणनीती ठरवली जाणार आहे. भाजप सरकार सूडबुद्धीने शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बारामती बंदची हाक दिली आहे. ऐन विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापण्याची चिन्हं आहेत.#SharadPawar #AjitPawar #Baramati #BaramatiBand

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राणे यांचा कोथळा बाहेर काढेन,अशी धमकी Shivsena MLA Santosh Bangar यांनी दिली आहे

News Desk

Supriya sule,Rohit pawar | रोहित तु निवडुन येणारचं..निर्धास्त रहा ! मी नाही भाजपं सांगतय….

Arati More

मराठा आरक्षणात गडबड झाल्यास सरकार जबाबदार,खासदार संभाजीराजे आक्रमक!

News Desk