HW Marathi
व्हिडीओ

शरद पवारांकडून शिवसेनेचं भरभरून कौतुक! पवारांच्या मनात चाललंय तरी काय?

राष्ट्रवादीच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त आज एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अनेक अर्थांनी या कार्यक्रमातील सर्वच नेत्यांनी एकंदर राज्यातील राजकारण, पक्षाची ध्येय आणि महाविकासआघाडी सरकारबाबत केलेली विधाने अत्यंत महत्त्वाची ठरतात. मात्र ह्यात प्रकर्षाने ज्या गोष्टीकडे लक्ष वेधले गेले ते होते राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेचे केलेले कौतुक. शरद पवार म्हणाले कि, “शिवसेना आणि आपण एकत्र काम करु शकतो असं कोणला पटलं नसतं. पण आपण लोकांना पर्याय दिला आणि त्यांनी तो स्वीकारला.शिवसेनेसोबत आपण कधी काम केलं नाही पण महाराष्ट्र शिवसेनेलासुद्धा कित्येक वर्षांपासून पाहत आहे. माझा यासंबंधीचा अनुभव विश्वास असणाराच आहे. ज्यावेळी जनता पक्षाचं राज्य आलं त्यानंतरच्या कालखंडात निवडणुकीत सगळीकडे काँग्रेसचा पराभव झाला असताना काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी एक राजकीय पक्ष पुढे आला….तो म्हणजे शिवसेना.”, असे म्हणत शरद पवारांनी बाळासाहेबांबाबतही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. काय म्हणले शरद पवार पाहूया.

#SharadPawar #UddhavThackeray #DevendraFadnavis #MVA #NCP #Shivsena #BJP #Congress #NanaPatole #AjitPawar #SanjayRaut #Maharashtra

Related posts

…मग कोट्यवधींचा बुलेट ट्रेन प्रकल्प का रद्द केला नाही ?

Gauri Tilekar

Sharad Pawar | पूरग्रस्तांसाठी शरद पवारांचा मदतीचा हात ..

Arati More

ठाकरे सरकारने गिरवला फडणवीसांचा पत्ता! घेतला सेम टू सेम निर्णय…

News Desk